सादरीकरणे

सादरीकरणासाठी लॉग-इन किंवा नोंदणी करा करा.

लेखकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

या नियतकालिकामध्ये सादरीकरणासाठी लेखकांना आमंत्रित केले आहे. सगळी सादरीकरणे या नियतकालिकाच्या उद्दिष्टे आणि व्याप्तीशी निगडित आहेत की नाही हे ठरवण्यासाठी संपादकाद्वारे मूल्यमापन केले जाईल. उद्दिष्टांशी आणि व्याप्तीशी जुळणारी सादरीकरणे स्वीकारायची की नाही हे ठरवण्यापूर्वी ती विषयतज्ज्ञांकडे समीक्षणासाठी पाठवली जातील.

सादरीकरणापूर्वी, सादरीकरणात समाविष्ट केलेली कोणतीही सामग्री; जसे छायाचित्र, दस्तऐवज आणि डेटासेट प्रकाशित करण्याची परवानगी मिळविण्याची जबाबदारी लेखकांची आहे. सादरीकरणावर नमूद केल्या गेलेल्या सर्व लेखकांनी लेखक या नात्याने संमती देणे आवश्यक आहे. आवश्यक तेथे, ज्या देशात संशोधन झालेले असेल त्या देशाच्या विधिसंमत आवश्यकतांनुसार संशोधनास योग्य त्या नैतिकता समितीने मान्यता दिली पाहिजे.

सादरीकरणात किमान गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता केलेली नसेल तर त्याचा अस्वीकार संपादक करु शकतात. लेख सादरीकरणापूर्वी, अभ्यासाची मांडणी आणि संशोधनाची कारणमीमांसा लेखनात योग्यरित्या संरचित आणि स्पष्टपणे केली आहे याची कृपया खात्री करा. शीर्षक संक्षिप्त आणि गोषवारा अभ्यासाची पूर्ण कल्पना देणारा असावा. यामुळे लेखनाचे समीक्षण करण्यास समीक्षकांची सहमती मिळवण्याची शक्यता वाढते. जेव्हा तुम्हाला असे खात्रीने वाटेल की तुमचे सादरीकरण या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत आहे तेव्हा कृपया खालील यादीक्रमाने (चेकलिस्ट) सादरीकरणाची प्रक्रिया सुरु करा.

सादरीकरणापूर्वीच्या तयारीची यादी

सर्व सादरीकरणांनी खालील आवश्यकतांची पूर्तता केली पाहिजे.

  • हे सादरीकरण लेखकांसाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करते.
  • हे सादरीकरण यापूर्वी प्रकाशित केलेले नाही किंवा ते प्रकाशनार्थ दुसऱ्या नियतकालिकाला पाठवलेले नाही.
  • सगळे संदर्भ अचूकता आणि पूर्णतेसाठी तपासलेले आहेत.
  • तक्ते आणि आकृत्यांना क्रमांक देऊन त्यांचे संक्षिप्त वर्णन केले आहे.
  • या सादरीकरणात वापरलेली छायाचित्रे, डेटासेट आणि इतर सामग्री प्रकाशित करण्यासाठी परवानगी मिळवली आहे.

Articles

Section default policy

गोपनीयता विधान

या नियतकालिकाच्या संकेतस्थळावर नोंदवलेली नावे आणि ई-मेल पत्ते केवळ या नियतकालिकाच्या नमूद केलेल्या उद्देशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही हेतूसाठी वापरले किंवा इतरांना उपलब्ध केले जाणार नाहीत.